चटपटीत रगडा पॅटिस
चटपटीत रगडा पॅटिस
रगडा पॅटिस हे एक इंडियन पोप्यूलर स्ट्रीट फ़ूड आहे. हा पदार्थ भारतामधे सर्व प्रांतात खायला मिलतो. रगडा पॅटिस या नावातच अनेक टेस्टी पदार्थांचे मिश्रण करुन केलेला पदार्थ आहे. त्यामुळे याची टेस्ट अफलातून आहे. भारतामधे हा एक प्रसिध्द पदार्थ म्हणून ओलाखला जातो. या स्ट्रीट फ़ूड ची चव अत्यंत नैसर्गिक आहे. थोड गोड, थोड आंबट, थोड तिखट असा हा चटपटीत पदार्थ खाण्यास अत्यंत चविष्ट आहे. चला आपण हा प्रसिद्ध इंडियन स्ट्रीट फ़ूड घरच्या घरी बनवूया.
यासाठी लागणारे साहित्य काय आहेत ते आपण
पाहुया :
प्रथम आपण रगडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेवूया
१. सूका
पांढरा वाटाना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे
२.
१ कप कांदा बारीक़ चिरून घ्या
३.
१ कप टोमेटो बारीक़ चिरून घ्या.
४.
आल लसून पेस्ट १ चमचा
५.
१ टेबल स्पून लाल चिली पावडर
६.
गरम मसाला १ चमचा
७.
पाव लहान चमचा हळद
८.
थोड़ी चिरलेली कोथिंबीर
९. चिंचेची
चटणी
आता आपण पॅटिस बनाविन्यासाठी लागणारे साहित्य घेवूया
१.
३ उकडलेले बटाटे घ्या आणि त्याची
साले काडून त्याला कुसकरून घ्या .
२.
लहान पाव चमचा हळद
३.
धने पूड १ लहान चमचा
४.
आर्धा चमचा चाट मसाला
५.
भाजलेल्या जीरे पूड १ चमचा ( cumin powder )
६.
गरम मसाला १ चमचा
७.
आल लसून पेस्ट १ लहान चमचा
८.
पोहे पाव वाटी स्वच्छ धुवून घ्या आणि
लगेच पाण्यातून काढून पिळून घ्या.
९.
चवीपुरते मीठ
रेसिपी
रगडा पॅटिस करण्यासाठी आता आपण
सुरुवात करुयात :
प्रथम आपण रात्रभर भिजत ठेवलेले वाटाने एका
कुकर मध्ये काढून घेवुया आणि त्यामधे वाटाने बूडतील इतके पाणी घेवुया त्यामध्ये
पाव चमचा हळद घालूया आणि त्यामधे चवीपुरते मीठ घालून कुकरचे झाकण लावून कुकरला
मध्यम आचेवर चार शिट्ट्या काढून घ्याव्यात.
वाटाना
शिजे पर्यत आता आपण पॅटिस ची तयारी करुयात. त्यासाठी आपण उकडून घेतलेले बटाटे
चांगले बारीक कुस्करून घेवुया. त्यामधे आपण धुवून घेतलेले पाव वाटी पोहे घालून
घेवुयात. ते पोहे घालत असताना हाताने कुस्करून घालुया. पोह्याने चीकटपणा छान येतो
व पॅटिस चांगले खुसखुशीत होण्यास मदत होते. आता त्यामधे १ चमचा आलं-लसून पेस्ट, १
चमचा गरम मसाला, १ चमचा भाजलेले जीरे पूड (cumin powder), अर्धा चमचा
हळद, १ चमचा धने पूड आणि चटपटीत चव येण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घालुया. आणि
चवीपुरते मीठ घालुया. आता हे सर्व एका भांड्यामधे कालवून मस्तपैकी मळून घेवुयात.
मळून झाल्यावर त्याचे गोळे बनवून घ्यावेत. गोळे बनवत असताना जर ते फुटत असतील तर
आणखी एकदा चांगले मळून घ्यावे. तयार झालेले गोळे फ़्राय करण्यासाठी गॅसवर १ पॅन
ठेवून त्यात २ छोटे चमचे तेल घालून त्यात ते पॅटिसचे गोळे एका बाजूने सोनेरी रंग
येईपर्यंत खरपूस असा फ़्राय करुन घ्या. नंतर तसेच दूसर्या बाजूने ते पॅटिस सोनेरी
होइपर्यंत फ़्राय करुन घ्या. तयार झालेले पॅटिस एका प्लेट मधे काढून घ्या.
आता
रगडा बनविण्याठी त्याच पॅन मधे ३ चमचे तेल गरम करुन घ्या. त्यामधे एक कप बारीक
चिरलेला कांदा टाकुन त्याला सोनेरी होइपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आता त्यामध्ये
बारीक चिरलेला १ कप टोमॅटो, १ चमचा आलं-लसून पेस्ट, एक टेबल स्पून गरम मसाला आणि १
टेबल स्पून लाल चिली पावडर टाकून त्याला ५ ते ६ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.
जेणेकरून टोमॅटो आणि इतर मसाले शिजून एकजीव होतील. आता कुकरमध्ये शिजवलेले वाटाने
तयार केलेल्या टोमॅटो मसाला मध्ये घालायचे आहे. आणि यामधे थोडेसे पाणी घालून
पून्हा मंद आचेवर ८ ते ९ मिनिटे शिजवून घेवुया.
आता
आपल्याकडे रगडा तयार आहे आणि पॅटिस पण तयार आहे. आता या दोघांचे मिश्रण करण्यासाठी
आपण एका प्लेट मध्ये २ मोठे चमचे रगडा घेवुया आणि त्यात आपण तयार केलेले २
क्रिस्पी पॅटिस ठेवुया. आता त्यावर आणखी थोडा रगडा घालुया, त्यावर थोडा एक बारीक चिरलेला
कांदा, थोड़ी शेव, त्यावर एक चमचा चिंचेची चटनी पसरुया आणि आपण वरुन बारीक चिरलेली
कोथिंबीर पसरूया.
आपण
तयार केलेला चटपटीत रगडा पॅटिस तयार आहे. अत्यंत टेस्टी असा हा रगडा पॅटिस तुम्ही
सुद्धा घरी करायला अगदी सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट आहे.
महत्वाची टिप
१. बटाटा कुकर ला शिजवत असताना ते जास्त उशीर शिजवू नये, जर जास्त शिजला तर कुस्करलेल्या बटाट्यांना पाणी सुटते. त्यासाठी कुकर वर फक्त २ शिट्ट्या काढाव्यात.
२. अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवायला जास्त उशीर लावू नये नाहीतर पोहे जास्त मऊ पडल्यावर बटाट्यांमध्ये मिक्स झाल्यावर त्याला चिकटपणा येणार नाही.
३. तयार झालेला रगडा जसा थंड होईल तसे ते घट्ट होते त्यामुळे तुम्हाला थोड़े पातळ हवे असल्यास गरजेपूरते पाणी वाढवून ते पुन्हा गरम करू शकता.

.jpg)
Comments
Post a Comment